Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात मीरा कुमार यांच्या मुलाला तिकीट;...

Political News | रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात मीरा कुमार यांच्या मुलाला तिकीट; आता येणार निवडणुकीत रंगत | Navarashtra (नवराष्ट्र)

Political News | रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात मीरा कुमार यांच्या मुलाला तिकीट; आता येणार निवडणुकीत रंगत | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांचा मुलगा अंशुल अविजित (Anshul Avijit) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांचा मुलगा अंशुल अविजित (Anshul Avijit) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासोबतच इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या कोट्यातील सर्व नऊ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले.

काँग्रेसने अजय निषाद यांना मुजफ्फरपूरमधून उमेदवारी दिली आहे. येथील विद्यमान खासदार निषाद यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांचा मुलगा आकाश प्रसाद सिंह यांना महाराजगंज मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. आकाशने मागील लोकसभा निवडणूक राष्ट्रीय लोक समता पक्षाच्या तिकिटावर पूर्व चंपारणमधून तत्कालीन केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांच्या विरोधात लढवली होती. ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments