Tuesday, October 20, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशातही काँग्रेसला खिंडार; अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश...

Political News | महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशातही काँग्रेसला खिंडार; अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशातही काँग्रेसला खिंडार; अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. इकडे मध्य प्रदेशातही भाजपाचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ग्वाल्हेर शहरातील अनेक नेत्यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले.

भोपाळ : महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. इकडे मध्य प्रदेशातही भाजपाचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ग्वाल्हेर शहरातील अनेक नेत्यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले.

भोपाळमध्येही नरोत्तम मिश्रा आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांच्या उपस्थितीत अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. सोमवारी सकाळी विदिशा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राकेश कटारे, माजी आमदार दिनेश अहिरवार यांच्यासह अर्धा डझन काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये दाखल झालेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये टिकमगडचे माजी काँग्रेस आमदार दिनेश अहिरवार यांचा समावेश आहे. याशिवाय छतरपूरचे माजी मंडी उपाध्यक्ष कैलाश द्विवेदी, गौरीहर जिल्हाध्यक्ष तुलसी अनुरागी, काँग्रेस नेते आशिष द्विवेदी आणि अनिल दीक्षित यांचा समावेश आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments