Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | काँग्रेसला मोठा दिलासा; जुलैपर्यंत कारवाई नाही, आता याप्रकरणाची पुढील...

Political News | काँग्रेसला मोठा दिलासा; जुलैपर्यंत कारवाई नाही, आता याप्रकरणाची पुढील सुनावणी… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

काँग्रेसला मोठा दिलासा; जुलैपर्यंत कारवाई नाही, आता याप्रकरणाची पुढील सुनावणी…

लोकसभा निवडणुकाजवळ आल्यावर आयकर विभागाने काँग्रेसला दोन नोटीस पाठवल्या आहेत. आयकर विभागाकडून तब्बल 3,567 कोटींची कर थकबाकी भरण्यासाठी नोटीस आल्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकाजवळ आल्यावर आयकर विभागाने काँग्रेसला दोन नोटीस पाठवल्या आहेत. आयकर विभागाकडून तब्बल 3,567 कोटींची कर थकबाकी भरण्यासाठी नोटीस आल्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी निवडणुका संपेपर्यंत करासाठी काँग्रेसवर कोणतीही जबरदस्ती करण्यात येणार नाही, असे आयकर विभागाकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जुलै रोजी होणार आहे.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आल्यावर लोकसभा निवडणुका संपेपर्यंत विरोधी पक्षाच्या विरोधात कोणतीही जबरदस्ती कारवाई करणार नाही, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. निवडणुका सुरू असल्याने कोणत्याही पक्षाला कोणतीही अडचण येऊ नये, अशी विभागाची इच्छा असल्याचेदेखील ते म्हणाले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments