PM Narendra Modi | पुढील 5 वर्षे गरिबांना मोफत रेशन मिळत राहील, पंतप्रधान मोदींनी केली घोषणा! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
PM Narendra Modi | पुढील 5 वर्षे गरिबांना मोफत रेशन मिळत राहील, पंतप्रधान मोदींनी केली घोषणा! | Navarashtra (नवराष्ट्र)


पुढील 5 वर्षे गरिबांना मोफत रेशन मिळत राहील, पंतप्रधान मोदींनी केली घोषणा!

छत्तीसगडमधील निवडणूक प्रचारादरम्यान पीएम मोदींनी आज मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीबांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळत राहील, असे त्यांनी म्हटले आहे.

छत्तीसगडमधील दुर्ग येथे निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीबांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन (free ration) मिळत राहील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेचा देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना फायदा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी ठरवले आहे की भाजप सरकार आता देशातील 80 कोटी गरीब जनतेला मोफत रेशन देण्याची योजना पुढील 5 वर्षांपर्यंत वाढवणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला सदैव मदत करतील. एक पवित्र निर्णय.” करण्याची शक्ती देते.”






Source link