Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशPm Modi | मोदींची सभा सुरू असताना मुलगी अचानक चढली खांबावर; पोलीस...

Pm Modi | मोदींची सभा सुरू असताना मुलगी अचानक चढली खांबावर; पोलीस प्रशासनात एकच खळबळ | Navarashtra (नवराष्ट्र)

Pm Modi | मोदींची सभा सुरू असताना मुलगी अचानक चढली खांबावर; पोलीस प्रशासनात एकच खळबळ | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मोदींची सभा सुरू असताना मुलगी अचानक चढली खांबावर; पोलीस प्रशासनात एकच खळबळ

तेलंगणाची राजधानी हैदराबादला लागून असलेल्या सिकंदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनसभेत चक्रावून टाकणारा प्रकार घडला.

हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादला लागून असलेल्या सिकंदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनसभेत चक्रावून टाकणारा प्रकार घडला. तेलंगणात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यानिमित्त मोदी जनसभेला संबोधित करत असताना एक मुलगी सभेसाठी लावण्यात आलेल्या लाईटच्या खांबावर चढली. त्यानंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. पंतप्रधान मोदींनी मुलीला खाली उतरण्यास सांगितलं. तिची समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर मुलगी खाली उतरली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तेलंगणात ३० नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. दिग्गज नेत्यांच्या रॅली आणि सभा सुरू आहेत. पंतप्रधान मोदी काल तेलंगणात होते. राज्यातील सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधत त्यांनी जनतेला भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. सिकंदराबादमधील त्यांच्या सभेला हजारोंची उपस्थिती होती.मोदींची सभा सुरू असताना एक मुलगी खांब्यावर चढली. त्यामुळे सुरक्षारक्षकांचा गोंधळ उडाला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments