फलटण (पुणे) – पुणे येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा येथे दिनांक ३१ जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या सीबीएसई (धनुर्विद्या) साउथ झोन ॥ स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत ५ राज्यांतील तब्बल ११४७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. इंडियन राऊंड, रिकर्व राऊंड आणि कंपाऊंड राऊंड अशा तीन प्रकारांत स्पर्धा पार पडल्या.
🔹 १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले.
- आयेशा शेख
- जान्हवी जाधव
- अनुश्री शिंदे
🔹 १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने कांस्यपदक (Bronze Medal) मिळवले.
- दिव्या ढेंबरे
- जान्हवी फाळके
- शिवश्री थोरात
विशेष म्हणजे, या खेळाडूंची सप्टेंबर महिन्यात पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व यशामध्ये प्रशिक्षक सुरज ढेंबरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्या मीनल दिक्षित तसेच शिक्षक वृंद यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.