Saturday, September 19, 2026
Homeसाताराफलटणच्या कॅनॉल परिसरालाही बारामतीच्या धर्तीवर सुशोभीकरणाची भेट

फलटणच्या कॅनॉल परिसरालाही बारामतीच्या धर्तीवर सुशोभीकरणाची भेट

फलटण :फलटण शहराच्या विकास आराखड्यात महत्त्वाची पायरी म्हणून निरा उजवा कालवा परिसराचे आकर्षक सुशोभीकरण होणार आहे. अनेक दिवसांपासून नागरिकांची ही मागणी होती. अखेर आमदार सचिन पाटील यांनी या कामाला गती देत फलटणलाही बारामतीप्रमाणेच नवा चेहरा मिळणार असल्याचे जाहीर केले.

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून झालेले सुशोभीकरण राज्यात आदर्श ठरले आहे. त्याच धर्तीवर फलटण शहरात देखील डांबरीकरण, कॅनॉलचे अस्तरीकरण आणि आकर्षक पद्धतीने उभारणी होणार आहे. काल यासाठी बारामती कॅनॉल परिसराची पाहणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

योजनेअंतर्गत जिंतीनाका ते रावरामोशी पूल या भागात दोन्ही बाजूंनी डांबरीकरण, पाथवेवर पेविंग ब्लॉक, वृक्षारोपण, लहान मुलांसाठी अत्याधुनिक उद्यान, ओपन जिम, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची बाकडी, आकर्षक पथदिवे यांची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे फलटण शहराला वेगळेपण आणि नवा देखावा मिळेल.

“ज्यांनी मला निवडून दिले त्यांच्या अपेक्षा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व महायुतीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करणार,” असे मत आमदार सचिन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

या पाहणी दौऱ्यात धोम बलकवडी व नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता बोडके, गपाट साहेब, कोकरे साहेब, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, तुकाराम शिंदे, सिराजभाई शेख, अमोल सस्ते, रणजीतबाबा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments