
फलटण प्रतिनिधी : फलटण शहरातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आज सुरूवात झाली असून गटनेते अशोकराव जाधव यांनी सर्वप्रथम नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. शहराच्या प्रथम नागरिकपदासाठी अर्ज करणारे ते पहिलेच उमेदवार ठरले.
गेल्या वीस वर्षांपासून फलटणच्या राजकारणात सक्रिय असलेल्या जाधव यांनी नगरसेवक, स्थायी समिती सदस्य आणि गटनेते म्हणून काम करताना पाणीपुरवठा, रस्ते विकास, ड्रेनेज सुधारणा, क्रीडा संकुल उभारणी आणि नागरिक सुविधा अशा अनेक विकासकामांवर भर दिला आहे.
सरळ, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख मिळवलेल्या जाधव यांनी अर्ज दाखल करताना “फलटणच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू करू” असे सांगितले.
,







