Sunday, September 13, 2026
Homeसातारागणेशोत्सवातील डीजे बंदीवर फलटण गणेश मंडळांचा एल्गार: "आता शांत बसणार नाही!"

गणेशोत्सवातील डीजे बंदीवर फलटण गणेश मंडळांचा एल्गार: “आता शांत बसणार नाही!”

फलटणःफलटण शहरातील गणेश मंडळांनी डीजे बंदीच्या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त करत, याविरोधात मोठ्या प्रमाणात एकत्र येण्याचा इशारा दिला आहे. “वर्षाचे 365 दिवस डीजे चालू असतो, मग फक्त गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्येच नागरिकांना त्रास होतो, असे कसे? लग्न, मुंजी आणि जयंती उत्सवांमध्ये डीजे कधी त्रास देत नाही, मग गणेशोत्सवातच डीजेवर आक्षेप का?” असा सवाल माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केला आहे.

जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले की, गणेशोत्सवातील डीजेवर बंदी घालण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. “जर प्रशासन गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालण्याचा प्रयत्न करणार असेल, तर सर्व गणेश मंडळांनी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवावा लागेल. अन्यथा, भविष्यात गणेशोत्सव साजरा करणे देखील कठीण होईल,” अशी तंबी त्यांनी दिली.

डीजेच्या आवाजावर मर्यादा असावी, याबाबत आम्ही सहमत आहोत, पण गणेशोत्सवाच्या काळातच डीजेवर बंदी घालणे अन्यायकारक आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. गणेश मंडळांनी आता या विरोधात एकत्र येऊन कठोर भूमिका घ्यावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सव हा फक्त सण नसून आपला सांस्कृतिक वारसा आहे. या उत्सवावर कोणतेही निर्बंध आणले गेले, तर त्याविरोधात उभे राहून आम्ही आपला हक्क अबाधित ठेवणार, असे जाधव यांनी ठणकावून सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments