Payal Waje: विशाल राठोडला मिळाली शिवली परबची सोबत! नव्याकोऱ्या जोडीचं रोमँटिक गाणं पाहिलंत का?

0
19
Payal Waje: विशाल राठोडला मिळाली शिवली परबची सोबत! नव्याकोऱ्या जोडीचं रोमँटिक गाणं पाहिलंत का?


‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब हीचा अभिनय तर साऱ्यांनाच माहीत आहे, आता या गाण्यातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा तिने साऱ्यांना भुरळ घातली आहे. तिच्या या गाण्यातील अनुभवाबद्दल बोलताना शिवाली म्हणाली की, ‘विशाल राठोड यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. या आधीही आम्ही एकत्र काम केलं आहे, त्यांची कामाची पद्धत, आणि त्यांना माझ्या कामाची पद्धत जुळत असल्याने कदाचित एकत्र काम करण्याचा योग सतत येत आहे. ‘पायल वाजे’ या गाण्याला कमी कालावधीत लोकप्रियता मिळाली, आणि हस्यजत्रेसोबत गाण्यातूनही माझ्यावर प्रेक्षक प्रेम करत आहेत, हे पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. ‘व्हीआर म्युझिक’ला, ‘पायल वाजे’ या गाण्याला व मला असंच भरभरून प्रेम द्या हीच विनंती’.



Source link