Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशPassengers Traveled With Dead body | रेल्वेत प्रवाशांनी मृतदेहासोबत केला प्रवास; भीतीने...

Passengers Traveled With Dead body | रेल्वेत प्रवाशांनी मृतदेहासोबत केला प्रवास; भीतीने प्रवासी रात्रभर जागेच, कुणीही मदतीला आलं नाही! | Navarashtra (नवराष्ट्र)

Passengers Traveled With Dead body | रेल्वेत प्रवाशांनी मृतदेहासोबत केला प्रवास; भीतीने प्रवासी रात्रभर जागेच, कुणीही मदतीला आलं नाही! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

चेन्नईहून हजरत निजामुद्दीनला जाणाऱ्या तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये प्रवाश्यांनी नागपूरहून झाशीला मृतदेह घेऊन प्रवास केला.

प्रवासादरम्यान अनेकदा काही मजेशीर गोष्टी घडत असतात. अनेकदा प्रवाशांमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण होतं, तर कधी अडचणीत असलेल्या प्रवाशांना सहप्रवाशी मदत करतानाही आपल्याला दिसतात. मात्र, यावेळी रेल्वे प्रवासात असं काही भितीदायक घडलं ज्यामुळे प्रवाशांना रात्रभर जागून प्रवास करावा लागला. तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात प्रवाशांनी चक्क मृतदेह घेऊन 600 किमीचा प्रवास केला. (Passengers Traveled With Dead body) यावेळी भीतीने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली त्याामुळे प्रवाशांनी मृतदेह बाहेर काढण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली. पण कोणीही त्याचं  ऐकलं नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने मृतदेहासोबतच प्रवास करावा लागला.

हे सुद्धा वाचा

नेमका काय प्रकार?

चेन्नईहून हजरत निजामुद्दीनला जाणाऱ्या तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या अनारक्षित डब्यातील एका प्रवाशाचा अचानक डोकेदुखीमुळे मृत्यू झाला. ट्रेन झाशीला पोहोचल्यावर मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावरून प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. 600 किमीच्या लांबच्या प्रवासात मृतदेह पाहून प्रवासी घाबरले. प्रवाशांनी भोपाळ स्थानकावरील रेल्वे अधिकाऱ्यांना मृतदेह काढण्याची विनंती केली, मात्र कोणीही ऐकले नाही. त्यामुळे प्रवाशांनी आहे त्या परिस्थितीत प्रवास करावा लागला. रेल्वे झाशीला पोहोचल्यावर मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments