
Parliament security breach Updates: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी (दि. १३ डिसेंबर) लोकसभा सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन अज्ञात तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत हे दोघे लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. यावेळी त्यांनी सभागृहात धुरकांड्या फोडल्या. या धुरकांड्या कल्याण येथून खरेदी केल्याचे घुसखोर अमोल शिंदे यांनी पोलिसांना माहिती दिली.







