Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशOTT platforms Banned | केंद्र सरकारकडून कारवाईचा दणका! ओटीटी प्लॅटफॉर्म व...

OTT platforms Banned | केंद्र सरकारकडून कारवाईचा दणका! ओटीटी प्लॅटफॉर्म व ॲप्सवर बंदी | Navarashtra (नवराष्ट्र)

OTT platforms Banned  | केंद्र सरकारकडून कारवाईचा दणका! ओटीटी प्लॅटफॉर्म व ॲप्सवर बंदी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

केंद्र सरकारकडून कारवाईचा दणका! ओटीटी प्लॅटफॉर्म व ॲप्सवर बंदी

ऑनलाईन कटेंटवर केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. केंद्र सरकारने अश्लील वेबसाईट्सवर बंदी घातली आहे.

दिल्ली: ऑनलाईन कटेंटवर केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. केंद्र सरकारने अश्लील वेबसाईट्सवर बंदी घातली आहे. यामध्ये 18 स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, 19 वेबसाईट्स, 10 अॅप्स आणि 57 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. ही एक मोठी कारवाई करण्यात आलेली असून या साईट्सवर बंदी घालण्यात आली आहे.

विविध माध्यमातून अश्लील आणि असभ्य गोष्टी दाखवण्यात आल्या. त्यामुळे यावर केंद्र सरकारने कारवाई केली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी अश्लीलता, असभ्यता आणि गैरवर्तन प्रकार वाढवण्यासाठी हे प्लॅटफॉर्म कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले. तसेच ते म्हणाले, १२ मार्चला अश्लील आणि असभ्य कंटेंट टाकल्यामुळे १८ OTT प्लॅटफॉर्म काढून टाकण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या तरतुदीनुसार भारत सरकारच्या इतर मंत्रालये/विभाग आणि मीडिया आणि मनोरंजन, महिलांचे हक्क आणि बाल हक्क या क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करुन यावर निर्णय घेण्यात आला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments