Friday, September 4, 2026
Homeसाताराफलटणमध्ये भाजपाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व शिबीराचे आयोजन

फलटणमध्ये भाजपाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व शिबीराचे आयोजन

फलटणः फलटण शहर भाजपाच्या वतीने फलटणकरांसाठी विशेष मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप आणि मोतीबिंदु शस्त्रक्रिया विषयी मार्गदर्शन व मदत यासाठी  शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या शिबिरासाठी भाजपाचे प्रमुख नेते व स्थानिक राजकारणी उपस्थित राहणार आहेत,  नरसिंह निकम (अध्यक्ष वकील साहेब), समशेरसिंह नाईक निंबाळकर (विरोधीपक्ष नेते), सचिन पाटील (फलटण-कोरेगाव विधानसभा प्रमुख), आणि अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर (माजी जिल्हा परिषद सदस्या) यांचा समावेश आहे. शिबिराचे आयोजन उद्या, २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्वामी समर्थ मंदिर, मलठण येथे होईल.

शिबिराचे उद्दिष्ट म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना मोफत नेत्र उपचार उपलब्ध करून देणे, तसेच मोतीबिंदू सारख्या आजारांवर त्वरित उपाय देणे.

शिबीराचे प्रमुख आयोजक व उपस्थित मंडळी:

रणजितसिंह नाईक निंबाळकर (माजी खासदार)

नरसिंह निकम (अध्यक्ष, वकील साहेब)

समशेरसिंह नाईक निंबाळकर (विरोधीपक्ष नेते)

सचिन पाटील (फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख)

अँड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर (माजी जिल्हा परिषद सदस्य)

अशोकराव जाधव (नगरसेवक)

अनुप शहा (शहराध्यक्ष, भाजपा)

सौजन्य: भारतीय जनता पार्टी (फलटण शहर)

तारीख व वेळ:
२ ऑक्टोबर २०२४, सकाळी ११ ते सायं. ५

ठिकाण:
स्वामी समर्थ मंदिर, मलठण

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments