Thursday, August 13, 2026
Homeसाताराडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने येथील प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फलटण तालुका पत्रकार संघाने एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.

दि.14 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास फलटण तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर 10:30 वाजता डेक्कन चौक येथील हॉटेल अशोकामधील सांस्कृतिक सभागृहात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा, नोटरी व सरकारी वकीलपदी नियुक्त झालेल्या वकिलांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी फलटण उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह फलटण शहर व तालुक्यातील विविध वृत्तपत्रातील पत्रकार उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण शहर व तालुका पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments