
Who Is Nupur Shikhare: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान ही बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत ३ जानेवारीला लग्न बंधनात अडकणार आहे. दोघांच्या लग्नाचे विधी आता सुरू झाले आहेत. आज नुपूर आणि आयरा यांचा हळदी विधी पार पडला. सध्या सोशल मीडिया आणि मीडियामध्ये आमिर खानच्या लेकीची आणि त्याच्या होणाऱ्या जावयाची चर्चा सुरू आहे. आमिर खानचा होणारा जावई कोण? त्याचं शिक्षण किती झालंय? त्याची कमाई किती? याची माहिती जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. चला तर, जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी…







