
फलटण : सांगली येथून बदली होऊन आलेले निखिल जाधव यांनी आज (दि.१६) फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला.
या बैठकीत त्यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, “सर्वसामान्य नागरिकांची कामे कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित राहणार नाहीत”. तसेच कामकाज जलद गतीने व पारदर्शकतेने करण्यावर नगरपरिषदेचा भर राहणार असल्याचे त्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत स्पष्ट केले.







