Saturday, September 12, 2026
Homeसाताराराजकीय समीकरणांचा नवा अध्याय: रामराजे नाईक निंबाळकर यांची सह्याद्री कदम यांच्यासोबत राजकीय...

राजकीय समीकरणांचा नवा अध्याय: रामराजे नाईक निंबाळकर यांची सह्याद्री कदम यांच्यासोबत राजकीय डिनर डिप्लोमसी

फलटण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची मांडणी सुरू असताना, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी आमदार चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम यांच्या निवासस्थानी राजकीय चर्चा साधली. या भेटीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अच्युतराव खलाटे आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांची उपस्थिती लाभली होती.

काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे राजे गटाचे दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय पटलावर माजी आमदार चिमणराव कदम यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राजे गटासोबत सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सह्याद्री कदम यांनी माढा लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, आणि आता शरद पवार आणि श्रीमंत रामराजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय वाटचाल अधिक प्रभावी होईल, अशी चर्चा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments