
Sharad Pawar NCP Campaign Song launched: राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली. तर, अनेक पक्षातील नेते राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रचारगीत ‘शरद पवार पुन्हा’ लॉन्च झाले आहे. याद्वारे तरुण आणि समाजातल्या सर्व घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात येत आहे.





