Saturday, September 26, 2026
HomeमनोरंजनNavri Mile Hitlerla: विक्रांतचं खरं रूप समोर येणार; एजे लीलाच्या जीवाला निर्माण...

Navri Mile Hitlerla: विक्रांतचं खरं रूप समोर येणार; एजे लीलाच्या जीवाला निर्माण झालेला धोका टाळू शकणार?

[ad_1]

Navri Mile Hitlerla latest update: ‘नवरी मिळे हिटलरला‘ या मालिकेत सध्या धमाकेदार कथानक पाहायला मिळत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील अभिराम आणि लीलाची जोडी सगळ्यांनाच आवडू लागली आहे. दोघांचे लुटूपुटूचे भांडण आणि प्रेम पाहण्यात प्रेक्षकांचे देखील मनोरंजन होत आहे. नुकतंच या मालिकेत अभिराम आणि लीला यांचं लग्न झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या दोघांचं लग्न प्रेमामुळे नाही तर, एका विचित्र घटनेमुळे घडलं होतं. लीलाची बहीण रेवती हिला विक्रांतने किडनॅप केल्यामुळे तिला हे लग्न करावं लागलं होतं. तर, रेवतीला डांबून ठेवणारी ही व्यक्ती अभिरामचं आहे, असं लीलाला वाटत आहे. मात्र, आता तिच्यासमोर सगळी सत्य परिस्थिती येणार आहे. दुसरीकडे लीलाची पहिली मंगळागौर आता पार पडणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments