Nava Gadi Nava Rajya: आनंदीच्या सुखासाठी चित्रगुप्ताचं मन वळवून शकेल का रमा? मालिकेत येणार रंजक वळण

0
18
Nava Gadi Nava Rajya: आनंदीच्या सुखासाठी चित्रगुप्ताचं मन वळवून शकेल का रमा? मालिकेत येणार रंजक वळण


आनंदीच्या पदरात इतकं मोठं दुःख का पडलं हे सांगताना चित्रगुप्त म्हणाले की, रमाला पुन्हा एकदा मानवी जन्म मिळणार होता. रमा, तिच्याच घरात म्हणजे आनंदी आणि राघव यांच्या पोटी मुलगी म्हणून पुन्हा जन्म घेणार होती. मात्र, मृत्यूनंतर रमाचा आत्मा पृथ्वीवरच फिरत बसला होता. रमाच्या याच चुकीमुळे तिला स्वर्गलोकी पोहोचायला उशीर झाला. तर, स्वर्ग लोकात देखील तिची शोधाशोध करून सगळे थकले. त्यामुळे तिचा पुनर्जन्म टळला. त्याचा परिणाम म्हणून आनंदीची कूस आता रिकामी राहणार आहे. मात्र, आनंदीच्या पदरी सुख पडावं म्हणून रमा प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे.



Source link