
‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या मालिकेचे जितके कौतुक करावे, तितके कमी आहे. जेव्हापासून या मालिकेची सुरवात झाली, त्या क्षणापासून मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद आणि प्रेम दिले. आनंदी, राघव, रमा, वर्षा, चिंगी ही सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून वसली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. आता या मालिकेत विराज इनामदारची एण्ट्री झाली आहे.







