
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्विप भेटीवरुन मालदिवच्या मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य सध्या चांगलच चर्चेत आहे. मालदीवचे आणखी एक नेते झाहिद रमीझ यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमध्ये पर्यटन वाढवण्याबाबत म्हण्टलयं की,’नक्कीच हे एक चांगले पाऊल आहे, पण आमच्याशी स्पर्धा करणे हा भ्रम आहे. ते आमच्यासारखी सेवा कशी देणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenra Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीपला (lashdweep) भेट दिली. पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि भारतात मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना सुरू झाली. खरं तर, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहनही केले होते. ही तुलना इतकी वाढली की, मालदीव सरकारलाही काळजी वाटू लागली. आता या प्रकरणाबाबत मालदीवच्या एका मंत्र्याने केलेल्या पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. या वादाने सोशल मिीट-ि
हे सुद्धा वाचा
मालदीवच्या मंत्र्याने काय म्हण्टले
मालदीवचे आणखी एक नेते झाहिद रमीझ यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमध्ये पर्यटन वाढवण्याबाबत लिहिले, ‘नक्कीच हे एक चांगले पाऊल आहे, पण आमच्याशी स्पर्धा करणे हा भ्रम आहे. ते आमच्यासारखी सेवा कशी देणार? मालदीवच्या मंत्र्यांच्या या सोशल मीडिया पोस्टने पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर वाद निर्माण केला आहे.









