Nagpur Airport Bomb Threat: नागपूर विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा मेल; सुरक्षा यंत्रणा अलर्ट; प्रवाशांमध्ये भिती

0
14
Nagpur Airport Bomb Threat: नागपूर विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा मेल; सुरक्षा यंत्रणा अलर्ट; प्रवाशांमध्ये भिती


Airport Bomb Threat News: नागपूरसह (Nagpur) जयपूर (Jaipur), कानपूर (Kanpur), गोवा (Goa) यासह देशातील अनेक विमानतळांना बॉम्बने उडवून देणारा मेल आला. या धमकीच्या मेलनंतर विमानतळावर मोठा गोंधळ निर्माण झाला. नागपूर विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास त्यांना धमकीचा ईमेल आला. विमानतळ संचालक आबिद रुई यांच्या मेल आयडीवर हा ईमेल आला. विमानतळाच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. या धमकीच्या ईमेलची तक्रार विमानतळ प्रशासनाने नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्यात केली. विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली.



Source link