
Mumbai Ramabai Colony Gangrape: मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी परिसरात धक्कादायक घटना घडली. बिल्डिंगमध्ये फ्लॅट देण्याचे आमिष दाखवत दोन जणांनी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने तिच्या पतीसह त्याच्या दोन मित्रांविरोधात सांगली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, घटनास्थळ मुंबईच्या पंतनगर येथील असल्याने सांगली पोलिसांनी हे प्रकरण पंत नगर पोलिस ठाण्यात वर्ग केले. पीडित महिलेला फिर्याद देण्यासाठी पंतनगर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पंत नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवले यांनी दिली.




