
कोणत्या लोकल गाड्या रद्द होणार?
सीएसटीहून १२.२८ वाजता ठाण्यासाठी सुटणारी लोकल दोन दिवस रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर सीएसटीहून १२.३१ वाजता कुर्ल्यासाठी सुटणारी लोकल शनिवार आणि रविवारी रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळं रात्री उशीरा सीएसटीहून कर्जतला सुटणारी लोकल अखेरची रेल्वे असणार आहे. रेल्वेने गर्डरच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेतल्यानंतर उपनगरीय सेवा रद्द राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय हावडा-सीएसएमटी रेल्वे दादर रेल्वे स्थानकावरच थांबवण्यात येणार आहे. तसेच भुवनेश्वर-सीएसएमटी रेल्वे ठाण्यात थांबवण्यात येणार आहे. शालीमार-एलटीटी एक्सप्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी या रेल्वे अर्ध्या तासाच्या उशीराने धावणार आहे.







