
मुंबई: घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
मुंबईतील चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली इमारतीला लागलेल्या आगीत तीन मुलांसह एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या इमारतीच्या तळमजल्याचा वापर दुकान म्हणून आणि वरचा मजला निवासस्थान म्हणून केला जात असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रेसी प्रेम गुप्ता (वय, ७), मंजू प्रेम गुप्ता (वय, ३०), अनिता धर्मदेव गुप्ता (वय, ३९), प्रेम छेदीराम गुप्ता (वय, ३०), नरेंद्र गुप्ता (वय, १०), विधी छेदिराम गुप्ता (वय, १५) आणि गीता देवी धर्मदेव गुप्ता (वय, ६०) अशी मृतांची नावे आहेत.