Mumbai air pollution : मुंबईतील धूळ कमी करण्यासाठी १ हजार टँकर भाड्यानं घेतले जाणार! कृत्रिम पावसाचाही विचार

0
17
Mumbai air pollution : मुंबईतील धूळ कमी करण्यासाठी १ हजार टँकर भाड्यानं घेतले जाणार! कृत्रिम पावसाचाही विचार


एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महापालिकेला रस्त्यावरील धुळ कमी करण्यासाठी पाणी मारण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी १००० टँकर तातडीने भाड्याने घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. या सोबतच सर्व रस्ते आणि पदपथांची नियमित साफसफाई करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहे. शिवाय, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो आणि बुलेट ट्रेन यांसारखे चालू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईचे रस्ते पाण्याने धुतल्यास धुळीचे प्रमाण कमी होईल प्रदूषण देखील कमी होईल.



Source link