
मंगेश कांबळे (वय, ३६) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, स्वाती कांबळे (वय, ३४) असे अपघातात जखमी झालेल्या माहिलेचे नाव आहे. मंगेश आणि स्वाती यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली. ते कांदिवली पूर्व येथे वास्तव्यास होते. हे दाम्पत्य रविवारी सकाळी ११ वाजता दुचाकीवरून विलेपार्लेच्या दिशेने निघाले. दुपारी चार वाजताच्या सुमारास खरेदीकरून परतल्यानंतर या दाम्पत्याने कांदिवलीतील आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. कांदिवली पश्चिम-पूर्व उड्डाणपुलाजवळील न्यू कल्पतरू इमारतीजवळ पोहोचले. त्यावेळी भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला डाव्या बाजूने ओव्हरटेक केला असता हा अपघात घडला.





