मिळालेल्या माहितीनुसार, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कार्यालयाच्या ई-मेलवर गणेश रमेश वानपाधरी या आरोपीने अनेकदा खंडणीचे मेल केले आहे. ई-मेलला उत्तर मिळत नसल्याने आरोपीने २०० कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. त्यानंतर मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीने दिली. त्यानंतर या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत तातडीने आरोपीवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला तेलंगणातून अटक केली असून त्याची कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास सुरू करण्यात आला आहे.







