हरियाणातील पलवल येथे होणाऱ्या राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्ती संघाने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील कु. ऋतुजा किशोर पवार यांची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. ही निवड मुधोजी महाविद्यालयासाठी तसेच फलटण तालुक्यासाठी गौरवाची बाब मानली जात आहे.
कु. ऋतुजा पवार यांनी महाविद्यालयात कुस्ती खेळताना उल्लेखनीय यश संपादन केले असून, आता प्रशिक्षक म्हणून देखील त्या राष्ट्रीय पातळीवर योगदान देत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच सोसायटीचे क्रीडा समिती अध्यक्ष व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री. दिलीप राजगुडा, सहायक तपासणी अधिकारी श्री. सुधीर अहिवळे, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम, नियामक मंडळ सदस्य श्री. महादेव माने, क्रीडा समितीचे सचिव श्री. सचिन धुमाळ, तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही ऋतुजा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.