Friday, August 14, 2026
Homeक्रीडाMS Dhoni | एमएस धोनीची १५ कोटींची फसवणूक, कोर्टात धाव, प्रकरण काय?...

MS Dhoni | एमएस धोनीची १५ कोटींची फसवणूक, कोर्टात धाव, प्रकरण काय? | पुढारी

MS Dhoni | एमएस धोनीची १५ कोटींची फसवणूक, कोर्टात धाव, प्रकरण काय? | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन : भारताचा महान क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याने त्याच्या माजी व्यावसायिक भागीदारांविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यात त्याने सुमारे १५ कोटींची फसवणूक केल्याचा दावा आहे. एमएस धोनीने आरका स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे ​​मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्याविरुद्ध रांची न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

मिहिर दिवाकर यांनी जागतिक स्तरावर क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी २०१७ मध्ये धोनी सोबत करार केला होता. मात्र, दिवाकर यांनी करारात नमूद केलेल्या अटींचे पालन केले नाही. या कराराच्या अटींनुसार फ्रँचायझी फी आणि नफा वाटून घेण्यास आरका स्पोर्ट्स बांधील होते. पण त्यांनी या अटींचे पालन केले नाही.

अनेक प्रयत्न करूनही करारात नमूद केलेल्या अटी व शर्तींकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, धोनीने (MS Dhoni) ने १५ ऑगस्ट २०२१ रोजी आरका स्पोर्ट्सला दिलेले अधिकृत पत्र मागे घेतले आणि अनेक कायदेशीर नोटिसा पाठवल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

विधी असोसिएट्सच्या माध्यमातून धोनीचे प्रतिनिधीत्व करणारे दयानंद सिंह यांनी असा दावा केली की त्यांची आरका स्पोर्ट्सने फसवणूक केली आहे आणि त्यामुळे त्यांचे १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

हे ही वाचा :

 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments