बरड जिल्हा परिषद गटातून सौ. वैशाली संदीप कांबळे यांचा शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

0
38
बरड जिल्हा परिषद गटातून सौ. वैशाली संदीप कांबळे यांचा शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल


फलटण :-   बरड (ता. फलटण) जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत सामाजिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी शिवसेना पक्षाच्यावतीने अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या गटात त्यांनी निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला असून निवडणूक राजे गटाच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
निंबळक (ता. फलटण) येथील रहिवासी असलेल्या सौ. वैशालीताई कांबळे या सामाजिक कार्यकर्त्या असून मालोजीराजे शेती शाळेत त्या उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत त्यांनी परिसरात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सौ. वैशालीताई कांबळे म्हणाल्या की, “ही निवडणूक केवळ राजकीय नाही तर समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठीची लढाई आहे. राजे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आणि जनतेच्या विश्वासावर ही निवडणूक ताकदीने लढवली जाईल.”
यावेळी त्यांच्या समवेत श्री. भोजराज नाईक निंबाळकर यांच्यासह शिवसेना व राजे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून बरड जिल्हा परिषद गटात ही लढत लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.