आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार २०२६ ने श्री. सिकंदर हजरत इनामदार यांचा गौरव

0
2
आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार २०२६ ने श्री. सिकंदर हजरत इनामदार यांचा गौरव

आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार २०२६ ने श्री. सिकंदर हजरत इनामदार यांचा गौरव

हलदहिवडी | प्रतिनिधी :-  सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, बाळे (सोलापूर) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा “आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार – २०२६” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार हलदहिवडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, हलदहिवडी येथील शिक्षकेतर कर्मचारी श्री. सिकंदर हजरत इनामदार यांना जाहीर झाला आहे.

शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे प्रामाणिकपणे, शिस्तबद्धपणे व कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

श्री. इनामदार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे हलदहिवडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

या पुरस्कारामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्याला मिळालेली ही सन्मानाची पावती असून, श्री. सिकंदर हजरत इनामदार यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

श्री. सिकंदर हजरत इनामदार यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!