
Mohammed Rafi Birth Anniversary : ‘ये रेशमी जुल्फें’, ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘तुम मुझे यूं भुला ना पाओगे’ ही मोहम्मद रफी यांची अशी अनेक गाणी आहेत, जी त्यांनी आपल्या मखमली आवाजाने सजवली आहेत. रफी साहेबांची कव्वाली, सूफी, रोमँटिक आणि दर्दभरी गाणी आजही लोकांच्या जिभेवर रेंगाळतात. संगीत सृष्टीतील दिग्गज मोहम्मद रफी यांची कारकीर्द तीन दशकांची आहे. हजारो गाणी रेकॉर्ड केलेल्या या दिग्गज गायकाला एक गाणे रेकॉर्ड करताना आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि रडतच त्यांनी गाण्याचे रेकॉर्डिंग केले.








