
बॉलिवूड अभिनेता दिव्येंदू शर्मा सध्या त्याच्या आगामी ‘मिर्झापूर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या घोषणेनंतर हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदु शर्मा स्टारर वेब सीरिज मिर्झापूर सुपरहिट ठरली होती आणि आता निर्माते या कथेतील पात्रांना घेऊन चित्रपट बनवणार आहेत, ज्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली आहे. या चित्रपटाविषयी दिव्येंदू शर्मा यांनी प्रेक्षकांना या चित्रपटाकडून काय अपेक्षा असू शकतात आणि मिर्झापूर चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होईल हे सांगितले.








