MI vs CSK : चेन्नईला पहिला झटका; अजिंक्य रहाणे बाद | पुढारी

0
20
MI vs CSK : चेन्नईला पहिला झटका; अजिंक्य रहाणे बाद | पुढारी









पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचे चाहते ज्या सामन्याची वाट पाहत असतात तो सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या रोमांचराकारी सामन्यात आयपीएलचे विजेतेपद प्रत्येकी पाच वेळा पटकावलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज एकमेकाला भिडत आहेत. सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (MI vs CSK)

चेन्नईला पहिला झटका; अजिंक्य रहाणे बाद

सामन्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणेच्या रूपात चेन्नई पहिला धक्का बसला. त्याला मुंबईचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीने हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केले. रहाणेला आपल्या खेळीत 8 बॉलमध्ये 5 धावांची खेळी करता आली.

सामन्यात कोणता संघ मारणार बाजी ?

कट्टर प्रतिस्पर्धी असलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात स्पर्धेतील 29 वा सामना मुंबईचे होमग्रांउड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. हे दोन्ही संघ एकमेकाचे प्रतिस्पर्धी असले तरी यावेळी रोहित शर्मा विरुध्द महेंद्रसिंग धोनी असा सामना यंदा पाहायला मिळणार नाही. कारण दोन्ही संघानी त्यांच्या संघाची कमान नव्या कर्णधारांच्याकडे सोपवली आहे.

मुंबई – चेन्नई हेड टू हेड

नव्या कर्णधारांच्या नेतृत्वात सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. दोन्ही संघामध्ये एकूण 36 सामने झालेले आहेत. यामध्ये मुंबईने 20 तर चेन्नईने 16 सामन्यात बाजी मारली आहे. गुणतालिकेत सहा गुणांसोबत चेन्नई तिसऱ्या तर चार गुणांसोबत सातव्या क्रमांकावर आहे. या हंगामात मुंबईने हार्दिकच्या नेतृत्वात 5 सामन्यात 3 सामन्यात हार तर दोन सामन्यात सलग विजय मिळवले आहेत. तर चेन्नईने पाच सामन्यात तीन विजय मिळवून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. (MI vs CSK)

हेही वाचा :













Source link