Merry Christmas Review: प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलाय का ‘मेरी ख्रिसमस’? वाचा रिव्ह्यू…

0
14
Merry Christmas Review: प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलाय का ‘मेरी ख्रिसमस’? वाचा रिव्ह्यू…


काय आहे कथानक?

‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाची कथा २४ डिसेंबरच्या रात्री म्हणजेच नाताळच्या आदल्या दिवशी घडत आहे. ख्रिसमसच्या रात्री, अल्बर्ट (विजय सेतुपती) नावाचा मुलगा सात वर्षांनी मुंबईला परतून येतो. यावेळी तो त्याच्या शेजाऱ्याला भेटतो आणि नंतर काही वेळाने ख्रिसमस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडतो. एका रेस्टॉरंटमध्ये अल्बर्टला मारिया (कतरिना कैफ) नावाची मुलगी तिच्या मुलीसोबत एकटी बसलेली दिसते. अल्बर्ट मारियाचा पाठलाग करतो आणि नंतर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू ते दोघे एकमेकांचे मित्र बनतात आणि मारिया त्याला ख्रिसमससाठी तिच्या घरी आमंत्रित करते. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, अल्बर्ट आणि मारिया खूप डान्स करतात, ड्रिंक्स करतात आणि आपल्या भूतकाळाबद्दल बोलतात. मात्र, या दरम्यान असे काहीतरी घडते, ज्यामुळे त्यांचे आयुष्य कायमचे बदलून जाते.



Source link