Wednesday, September 30, 2026
Homeसाताराराष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व विद्यमान आमदार महादेव जानकर  व श्रीमंत संजीवराजे...

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व विद्यमान आमदार महादेव जानकर  व श्रीमंत संजीवराजे यांची भेट

फलटण : फलटण येथील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ” सरोज व्हिला ” या निवासस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व विद्यमान आमदार महादेव जानकर हे आज श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या भेटीसाठी आले होते त्यावेळी फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा याठिकाणी उपस्थिती होते

माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी महादेव जानकर हे इच्छुक असून ; महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून त्यांच्या नावाची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे . तसेच माढा लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा महायुतीतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते .


विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये आज फलटण (कोळकी )येथील अनंत मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित केलेल्या आहे .

महादेव जानकर यांनी आज श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या भेटीसाठी ते आल्याने फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात विविध चर्चांना उधाण आले आहे .

महादेव जानकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास कमरा बंद चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments