
Meerut Murder Case : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या सौरभ राजपूत हत्याकांड अर्थात मेरठ हत्याकांड प्रकरणात दर दिवशी एक नवा खुलासा होत असून त्यातच आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसणारी दृश्य अनेकांना विचलित करत असून, कृर वृत्तीच्या मुस्कान आणि साहिलचे खरे असुरी रंग इथं दिसत आहेत.
काही सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये मुक्सान आणि तिचा प्रियकर साहिल एके ठिकाणी पार्टी करताना दिसत असून ते बेधुंद असल्याचं पाहताक्षणी लक्षात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशातील कसो इथला असून, मुस्काननं पती सौरभची हत्या केल्यानंतर ती आणि साहिल थेट हिमाचल प्रदेशला पोहोचल्याचं म्हटंल जात आहे.
14 मार्च रोजी या दोघांनीही तिथंच होळी साजरी केली आणि या पार्टीदरम्यान एका क्लबमध्ये नशेच्या अधीन असणाऱ्या या निर्दयी जोडीनं विचित्र हावभाव, हातवारे, नाच केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. आजुबाजूला असणाऱ्या गर्दीचाही या दोघांवर फारसा फरक पडतान दिसत नाही हेच व्हिडीओतून स्पष्ट होत असून या व्हिडीओनंतर आता अनेकांनीच संताप व्यक्त करत मुस्कान आणि साहिलला कठोर शिक्षा करण्यात यावी अशीच मागणी केली आहे.
मेरठ हत्याकांड प्रकरणातील महत्त्वाच्या नोंदी…
- मुस्काननं साहिलच्या मदतीनं 3 मार्च रोजी पती सौरभ राजपूतची हत्या केली.
- सौरभच्या मृतदेहाचे तुकडे करत त्यांनी एका ड्रममध्ये हे तुकडे टाकत त्यावर सिमेंट ओतून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
- यानंतर मुस्कान आणि साहिल हिमाचल प्रदेशात सुट्ट्यांसाठी गेले.
- दोघांनीही मिळून सौरभच्या कुटुंबाला मेसेज करत त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
- 18 मार्च रोजी मुस्काननं आपल्या आईसमोर या गुन्ह्याची कबुली दिली ज्यानंतर पोलिसांनी साहिल आणि मुस्कानला अटक करत त्यांची रवानगी मेरठ कारागृहात केली.
याआधीही व्हायरल झालेला डान्स व्हिडीओ…
हे प्रकरण उघडकीस आल्या क्षणापासून सोशल मीडियावर आरोपींचे काही व्हिडीओ समोर आले होते. यामधील एका व्हिडीओमध्ये मुस्कान साहिलला केक भरवताना दिसली. त्याआधी होळी साजरा करताना चेहऱ्यावर रंग लागलेले आरोपींचे फोटोसुद्धा समोर आले होते. दरम्यान, हिमाचलच्या प्रवासादरम्यान मुस्कान आणि साहिलला तिथं फिरवणाऱ्या कॅब चालकानंही या जोडीसंदर्भात धक्कादायक माहिती दिली.
Meerut Murder Case के आरोपी Muskan Rastogi और Sahil Shukla का Kasol में होली पार्टी करता नया वीडियो वायरल! 3 मार्च को Saurabh Rajput की हत्या की, 14 मार्च को हिमाचल में म्यूजिक, भांग और मस्ती में डूबे दिखे! #MeerutMurderCase #MuskanRastogi #SaurabhRajput #SahilShukla… pic.twitter.com/kBLVxV9kOY
— State Mirror हिंदी (@statemirrornews) March 25, 2025
जिथं त्यांच्या मद्यपानापासून साहिलच्या वाढदिवसाची केक खरेदी आणि मुस्कानला घरून येणारे फोन इथपर्यंतचा खुलासा कॅब चालकानं केल्याचं म्हटलं जातं. साहिल आणि मुस्कान मद्याच्या आहारी गेल्याची धक्कादायक बाब इथं समोर आली असून आता याप्रकरणात पुढं कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.








