
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मरीन ड्राईव्ह परिसराचा काही महिन्यांपूर्वी दौरा केला होता. त्यावेळी नागरी सुविधा, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि सुशोभिकरणाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्राच्या दिशेकडील इमारतींना विशिष्ट प्रकारची रंगरंगोटी करावी. प्रसाधनगृहे, स्वच्छतेची काळजी घेत आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो सुरू करण्याच्या सूचना बीएमसीला केल्या होत्या. परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर मरीन ड्राईव्ह परिसराचं सुशोभिकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे.







