
मनोज जरांगे यांच्या सभेविषयी व भाषणाविषयी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘भारतीय जनता पक्षानं जाती-जातींमध्ये लावलेली आग आता पेटायला लागली आहे. सत्तेसाठी काहीही करण्याचं भाजपचं जे धोरण आहे, त्याचा परिणाम फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार जपणाऱ्या महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळंच लोक जातींचे मोर्चे काढत आहेत. कोणाला आरक्षण हवं आहे, तर कोणाला आपलं आरक्षण जाण्याची भीती आहे. ही धास्ती निर्माण करण्याचं आणि माणसाला-माणसाविरोधात उभं करायचं पाप भाजपनं केलं आहे, असा आरोप पटोले यांनी केला.







