manish sisodia :पत्नीला मिठी मारून ढसाढसा रडले मनीष सिसोदिया, मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, ‘चित्र वेदनादाई’

0
15
manish sisodia :पत्नीला मिठी मारून ढसाढसा रडले मनीष सिसोदिया, मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, ‘चित्र वेदनादाई’


आपल्या आजारी पत्नीला भेटल्यानंतर सिसोदिया दुपारी ४ वाजता तिहार तुरुंगात रवाना झाले. तुरुंगात जाण्यापूर्वीचा त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. सिसोदिया आपल्या आजारी पत्नीला मिठी मारून रडत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. यात त्यांची पत्नी देखील त्यांना मिठीत घेऊन रडताना दिसत आहे. या दोघांभोवती अनेक पोलिस उभे आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वात मोठे नेते अरविंद केजरीवाल यांनी हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘हे चित्र खूप वेदनादायक आहे. देशातील गरीब मुलांना आशा देणाऱ्या व्यक्तीवर असा अन्याय योग्य आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.



Source link