
मुंबईतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्रीने अभिनय विश्वात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. आपलं स्वप्न पूर्ण करत मंदिरा बेदीने १९९४मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. मंदिराने डीडी नॅशनलची लोकप्रिय मालिका ‘शांती’ मध्ये काम केले. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. यानंतर ती ‘औरत’ आणि ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘इंडियन आयडॉल’, ‘फेम गुरुकुल’, ‘डील या नो डील’सारख्या काही मालिकांमध्येही झळकली.








