
काय आहे मानसीची पोस्ट?
“स्वत:च्या स्वार्थासाठी परमार्थ करत आहे. नवे रस्ते शोधण्यासाठी जुन्या वाटेने जात आहे.
विश्वासाने विश्वास ठेवते कुणावर,अविश्वासाने संशय घेते, त्यावर सत्याच्या वाटेने जाण्यासाठी असत्याची कास धरावी लागते,
खरं खोटं जाणण्यासाठी देवालाच हाक द्यावी लागते.
माझं सारं खरं खोटं देवालाच ठाऊक आहे.
म्हणूनच माझा त्याच्यावर विश्वास आहे.
भावनांचा विचार केला तर माझं मन एक दगड आहे, मनाच्या या दगडाला प्रामाणिकतेचा पैलू आहे.
प्रामाणिकपणे या दगडाला एक एक पैलू पडत आहे, हिरा होईल ना होईल या दगडाची किंमत वाढवत आहे.
आपण पुढे जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ते आपोआप होणार नाही. तुम्हाला स्वत:ला उठून म्हणावे लागेल, हे किती कठीण आहे, याची मला पर्वा नाही. मी किती निराश आहे, याची मला पर्वा नाही. मी माझ्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे जात आहे”, असे कॅप्शन मानसीने दिले आहे.






