
‘इंडिया आघाडी’च्या नावाखाली राष्ट्रीय पातळीवर अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. सुरुवातीच्या काही बैठकांनंतर इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये राज्याराज्यांत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. काँग्रेसची चांगली ताकद असलेल्या दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांत जागावाटपाचा मोठा पेच होता. सध्या ईडीच्या रडारवर असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससोबत सामोपचाराची भूमिका घेतली आहे. मात्र, ममता बॅनर्जी जागावाटपात कोणतीही तडजोड करण्यास तयार नव्हत्या.










