
बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर कार्यक्रमाच्या सेट बाहेरील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्यांनी “झलक दिखला जा कार्यक्रमात पाहुणा म्हणून जाऊन आनंद झाला, त्यांनी मला माझ्या सुरुवातीच्या काळात परत नेले, माझा गेल्या ४३ वर्षांचा प्रवास मी पुन्हा पाहिला” असे कॅप्शन दिले आहे.







