Malaika And Arjun Kapoor: मलायकाने शेअर केला अर्जुन कपूरचा न्यूड फोटो; सोशल मीडियावर होतेय ट्रोल!

0
25
Malaika And Arjun Kapoor: मलायकाने शेअर केला अर्जुन कपूरचा न्यूड फोटो; सोशल मीडियावर होतेय ट्रोल!


मलायका अरोराने रविवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोफ्यावर बसून आळस देताना दिसत आहे. मात्र, या फोटोमध्ये त्याने कपडे परिधान केलेले नाहीत. तर, केवळ एका लहान उशीने आपले शरीर झाकले आहे. अर्जुन कपूरचा हा फोटो जरी ब्लॅक अँड व्हाईट असला, तरी या फोटोने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. अर्जुन कपूरचा टॅटूही या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. मलायका अरोराने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझा अतिशय आळशी मुलगा’. अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर या पोस्टचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे.



Source link