
महेश बाबूची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ सतत पाहायला मिळते. अभिनेत्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महेश बाबू देखील आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. या दरम्यानच्या काळात तो अनेक बॉलिवूड चित्रपटांचं प्रमोश करताना देखील दिसला आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महेश बाबूने हातभार लावला आहे. ‘अॅनिमल’ हा चित्रपट १ डिसेंबरला हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा वडील आणि त्यांच्या मुलाभोवती फिरणार असल्याचे म्हटले जात आहे. आगाऊ बुकिंगमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा ओपनर ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.







