
Maharashtracha Favourite Kon Nomination: नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्काराचे वेध रसिक मनाला लागत असतात. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना आणि त्याच्याशी संबंधित विभागांना सन्मानित करणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्याची यंदाची नामांकन यादी जाहीर झाली आहे. ‘झी टॉकीज’ वाहिनीवर हा दिमाखदार पुरस्कार सोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे.







